आणखी एका डॉक्टरचा करोनाने मृत्यू
धुळे

आणखी एका डॉक्टरचा करोनाने मृत्यू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळे तालुक्यातील सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पेश प्रकाश वाघ (वय 40) यांचा कोरोनाने बुधवारी नाशिक येथे उपचार घेतांना मृत्यू झाला. त्यांच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन दिवसात धुळ्यातील दोन डॉक्टरांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

डॉ. कल्पेश वाघ यांना लिव्हरचा आजार असल्याने तीन दिवसापुर्वी धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू त्यांची प्रकृती सोमवारी अधिक खालवल्याने त्यांना नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्यांचा अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आला.

डॉ. वाघ यांची प्रकृती अधिकच खालावली व त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे बंद केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतू डॉक्टरांना अपयश आले. उपचारादरम्यान डॉ. वाघ यांचा मृत्यू झाला.

डॉ. वाघ हे दोन वर्षापासून सोनगीर ग्रामीण रुग्णालयात प्रभारी अधिक्षक म्हणून कार्यरत होते. दोन महिन्यापुर्वीच या पदावर अन्य डॉक्टरांची नियुक्ती झाल्यानंतर ते त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

डॉ. कल्पेश यांच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. धुळ्यात कोरोनाने दोन डॉक्टरांचा बळी गेला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com