वाझे प्रकरणातील संशयीत पोलिसांचे धुळे कनेक्शन

अनिल गोटेंचा गौप्यस्फोट, पिस्तुल प्रकरणात तब्बल 80 लाखांची तोडीपाणी
अनिल गोटे
अनिल गोटेAnil Gote

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

सध्या राज्यात गाजत असलेल्या पोलीस अधीकारी सचिन वाझे प्रकरणात संशयाची सूई असलेल्या सुनिल माने व कोतमीरे या दोन अधिकार्‍यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

यापैकी सुनिल माने यांचे थेट धुळे कनेक्शन असून पिस्तुलच्या एका प्रकरणात सुमारे 80 लाखांची तोडीपाणी झाल्याचा गौप्यस्पोट माजी आ.अनिल गोटे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धुळे-नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी अनिल गोटे यांनी आज पत्रक प्रसिध्दीस पोलीस प्रशासनाबाबत गंभीर आरोप केले आहेत.

त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, पिस्तुल, देशी कट्टा विकणारी एक टोळी मुंबई क्राईम ब्रँचच्या कांदेवली युनिअला सापडली. मुंबईच्या आरोपीने आपण मालेगावावहून पिस्तुल घेतल्याची माहिती दिली. तो धागा पकडून या क्राईम बॅ्रचचे तीन अधिकारी मालेगावात आले.

मालेगावातील दलालाने धुळ्यातील विक्रेत्याचे नाव सांगितले. 12 जानेवारी रोजी वाझे प्रकरणातील संशयीत सुनिल माने यांच्यासोबत काम करणारे तीन पोलीस अधिकारी मालेगाव येथे आले होते.

यामुळे धुळ्यातील अवैध व्यवसायात कार्यरत असणार्‍यांनी मालेगावकडे धुम ठोकली. काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी हे प्रकरण आपल्यापर्यंत येवू नये म्हणून परस्पर मिटविण्याचा प्रयत्न केला. यातच 80 लाखांवर तोडी झाल्याचे श्री.गोटे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

अर्थात असे प्रकार पहिल्यांदाच घडलेले नाही. तर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान या राज्यातून तसेच मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या शहरातून चारचाकी आणि दुचाकी चोरुन आणायच्या.

अपघातग्रस्त वाहनांचे नब्बर त्यावर लावायचे, आरटीओ कार्यालयातून बनावट कागदपत्रे तयार करायची आणि मिळेल त्या किमतीत विकायचे असा गोरख धंदा आधिकपासून सुरु आहे. पोलीस प्रशासनालाही हे माहित असून यातील काही गाड्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय वापरत असल्याचे छायाचित्र आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावाही श्री.गोटे यांन केला आहे.

आपले म्हणणे खरे ठरले

शिरपूर तालुक्यातील सुमारे 1500 एकरवर गांजाची शेती केली जाते. यातील 500 एकर क्षेत्र वनविभागाचे आहे. याप्रकरणात आपण लक्ष घातले तेव्हा शिरपूर, सांगवी, पिंपळनेर अशा सिमावर्ती असलेल्या भागातील पोलीस ठाण्यांवर अधिकार्‍यांच्या नियुक्तीचा दर 80 लाख ते दीड कोटी पर्यंत असल्याचे आपण म्हटले होत.

यातील सत्य आता हळूहळू बाहेर येवू लागले आहे. अशा प्रकरणात प्रशासनाने लक्ष घालण्या ऐवजी दौलत गडातील रंगमहाल परिसरात गेलो म्हणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठरावीक पोलिसाांबद्दल बोललो तरी पुन्हा गुन्हा दाखल झाला. दोंडाईचा पोलीसात चौकशीसाठी जातांना हजार कार्यकर्त्यां ऐवजी एकटाच गेलो.मला पोलीस प्रशासनाने नोटीसा बजावून धमक्या दिल्या.

मात्र आ.रावलांच्या शेकडो कार्यकर्ते मिरवणुकीने दोंडाईचातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले, घोषणाबाजी केली. हे पोलिसांना दिसले नाही काय? पोलीस किती पक्षपाती वागते आहे याचेच हे उदाहरणे आहेत.

धुळे जिल्ह्यातील वाझे प्रवृत्तीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर काय कारवाई करणार, असा सवालही श्री.गोटे यांनी पत्रकात उपस्थित केला आहे.

बदल्यांच्या सुपार्‍या घेणारा कोण ?

धुळे जिल्हा पोलीस खात्यातील एक कर्मचारी उघडपणे बदल्यांच्या सुपार्‍या घेत फिरत आहेत. मुंबईला मंत्र्यांच्या कार्यालयात बसून, मंत्र्यांचे दूरध्वनी वापरून स्थानिक अधिकार्‍यांना धमकावणे, दबाव आणणे, बेकायदेशीर कामे करायला भाग पाडणे, यातून पैसा कमाविण्याचे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. हा उघडपणे फिरणारा, सुपार्‍या बहाद्दर कोण? असा प्रश्नही श्री.अनिल गोटे यांनी या पत्रकातून उपस्थित केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com