धुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून
धुळे

धुळे : चिमठाणेनजीक ट्रक उलटला, अनेकांनी दारूचे बॉक्स नेले वाहून

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

चिमठाणे | दि.२० | वार्ताहर

धुळ्याकडून नंदुरबारकडे विदेशी दारू घेवून जाणार्‍या ट्रकला समोरून येणार्‍या वाहनाने हुलकावणी दिल्याने  भरधाव ट्रकाचा चिमठाणेनजीक पुलावर आज दुपारी अपघात झाला.  त्यामुळे ट्रकमधील विदेशी दारूचे बॉक्ससह इतर साहित्य रस्त्यावर विखुरले. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह रस्त्यावरून जाणार्‍या वाहनधारकांनी दारूचे बॉक्स, बाटल्यांसह काचेचे ग्लास, वाट्या असा लाखोंचा माल वाहुन नेल्या. दारूच्या बाटल्या घेण्यासाठी अनेकांची झुंबड उडाली होती.  दरम्यान अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे दोन ते तीन कि.मी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  अपघातानंतर अनेक बॉक्समधील बाटल्या फुटून लाखोंचे नुकसान झाले आहे.

अपघातात ट्रक चालक गंभीर  झाला असून त्याला चिमठाणे गावातील नागरिकांनी मदतीचा हात देत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.  अपघात वाहनाचे देखील माठेे नुकसान झाले आहे. रस्त्यावर दारूच्या बाटल्यांचे काच व बॉक्स पडलेले होते. लाखाे रुपयांचे ऑफिसर चॉईस दारूचे बॉक्स व काचेचे ग्लास, वाट्या नागरिकांनी वाहुन नेल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com