अपर तहसीलदारांसह पथकाला मारहाण

17 जणांवर गुन्हा, पाच अटकेत
अपर तहसीलदारांसह पथकाला मारहाण

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

चिमठाणे- दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल हिरकणीसमोर गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्‍यांकडून अपर तहसीलदारांसह पथकाला ...

धक्काबुक्की करण्यात आली. त्यात तहसीलदार हे जखमी झाले आहेत. ही घटना काल मध्यरात्री घडली. याप्रकरणी 17 जणांविरूध्द शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपर तहसीलदार सुदाम महाजन यांच्या पथकाने काल दि. 6 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चिमठाणे- दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल हिरकणी येथे मुरूम या गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या तीन ट्रॅक्टर व जेसीबीला पकडले.

त्यानंतर वाहने कारवाईसाठी शिंदखेडा पोलिस ठाण्यात घेवून जात असतांना किशोर महादू पाटील, शरद महादू पाटील यांनी वाहने आडवे लावले.

तिनही ट्रॅक्टरमधील मुरूम हॉटेल हिरकणीच्या आवारात दांडगाईने शिवीगाळ व धक्काबुक्की करून जबरीने उपसून ट्रॅक्टर पळवून नेवून अडथळा निर्माण केला. त्यात अपर तहसीलदार सुदाम महाजन हे जखमी झाले.

याप्रकरणी अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी शिंदखेडा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर महादु पाटील, शरद महादु पाटील, सचिन बन्सीलाल पाटील (वय 23), रावसाहेब कौतिक पाटील (वय 30), संदीप साहेबराव पाटील सर्व (रा. हातनुर ता. शिंदखेडा) व इतर दहा ते बारा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वरील पाच जणांना अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com