धुळे - Dhule - प्रतिनिधी :

देवपूरातील मुंबई-आग्रा महामार्गाच्या सर्व्हीस रोडवर भरधाव कारच्या धडकेत जि.प. कर्मचारी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली.याप्रकरणी देवपूर पोलिसात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेंद्र रामचंद्र फुलपगारे (वय 54 रा. प्लॉट नं. 75, भगवती नगर, देवपूर, धुळे) असे त्याचे नाव आहे. ते जिल्हा परिषदेतील लेखा विभागात कार्यरत होते.

आज सकाळी ते दोंडाईचा येथून बसने धुळ्यात आले. बसमधून उतरल्यानंतर ते सर्व्हीस रोडने अक्षता मंगल कार्यालयाजवळून भोई सोसायटीकडे वळण रस्त्याने पायी जात होते.

त्यादरम्यान आठ वाजेच्या सुमारास त्यांना समोरून येणार्या भरधाव कारने (क्र. एमएच 18 बीसी 1672) जोरदार धडक दिली.

त्यात गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातनंतर चालक कार सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच जि.प कर्मचार्यांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

याप्रकरणी निलश कृष्णा नगराळे याने देवपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकाविरूध्द गुन्हा करण्यात आला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली आहे.