ट्रकच्या धडकेत पिता-पुत्र ठार

आई गंभीर जखमी ; नातेवाईकांची वाट पाहतांना नियतीचा घाला
ट्रकच्या धडकेत पिता-पुत्र ठार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

बोरकुंडे ते आर्वी रस्त्यावरील मांडळ फाट्यानजीक रस्त्याच्या खाली दुचाकी लावून नातेवाईकांची वाट पाहतांना उभ्या असलेल्या तिघांना भरधाव आयशर ट्रकने धडक दिली. त्यात पिता- पुत्र ठार झाले. तर आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र रामसिंग राजपुत (वय 40), जयपाल राजेंद्र राजपुत अशी दोघा मयतांची नावे आहेत. तर संगीताबाई राजेंद्र राजपुत (वय 38) रा. हेंद्रूण ता. धुळे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

तिघे काल दि. 26 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मांडळ फाट्यापुढे गलाटी नाल्याजवळ दुचाकी (क्र. एमपी 09 एचएच 4212) रस्त्याच्या खाली उभी करून नातेवाईकांची वाट बघत उभे होते.

त्यादरम्यान त्यांना भरधाव वेगाने येणार्‍या आयशर ट्रकने (क्र. एमपी 09 एचएच 4212) जोरदार धडक दिली. त्यात पुढच्या चाकात येवून तिघे गंभीर जखमी झाले.

तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

राजेंद्र राजपुत व मुलगा जयपाल यांना डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. तर संगीताबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर आयशर चालक पसार झाला. याप्रकरणी प्रकाश गुलाब राजपुत रा. हेंद्रूण यांच्या फिर्यादीवरून आयशर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com