भरधाव रूग्णवाहिकेने एकाला उडविले

भरधाव रूग्णवाहिकेने एकाला उडविले

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील शिरूड चौफुलीवर भरधाव रूग्णवाहिकने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री हा अपघात झाला. याप्रकरणी चालकावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिलाल भिसन जाधव (वय 56 रा, नरव्हाळ ता. धुळे) असे मयताचे नाव आहे. ते दि. 20 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शिरूड चौफुलीजवळील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोरील गेटजवळ रस्त्यावर उभे होते.

त्यादरम्यान त्यांना एका पांढर्‍या रंगाच्या रूग्णवाहिकेवरील (क्र. एमएच 18 बीजी 6154) चालकाचे पुढील वाहनाला ओव्हरटेक करीत असतांना वाहनावरील नियंत्रण सुटून जोरदार धडक दिली.

त्यात गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रूग्णवाहिका चालक त्यांना मदत न करता गाडी सोडून पळुन गेला.

याप्रकरणी ज्ञानेश्वर निळकंठ इंगळे (वय 37 रा. चोपडा) यांच्या फिर्यादीवरून रूग्णवाहिका चालकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com