धुळ्यासह शिरपूरात अपघातात दोन तरूण ठार

धुळ्यासह शिरपूरात अपघातात दोन तरूण ठार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरासह शिरपूर तालुक्यातील अजनाड बंगला गावानजीक झालेल्या दुचाकीच्या अपघातात दोन तरूण ठार झाले. याबाबत संबंधीत पोलिसात नोंद झाली आहे.

अतूल प्रताप पाटील (वय 36 रा. अजबेनगर, विद्यावर्धीनी शाळेच्या पाठीमागे, धुळे) हा काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच 18 एक्यु 8185) वडेल रोडने बोरीस गावी जात होता.

त्यादरम्यान वडेल चौफुलीच्या पुढे वडेल गावाकडून येणार्‍या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.

याबाबत सचिन बोरसे यांच्या माहितीवरून पश्चिम देवपूर पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे. तपास पोना जाधव करीत आहेत.

तसेच दुसरा अपघात त्याच दिवशी दुपारी बारा वाजता शिरपूर-चोपडा रस्त्यावरील अजनाड बंगला गावानजीक झाला. भिमा देविदास भिल (वय 23 रा. उंटावद ता. शिरपूर) हा तरूण दुचाकीने शिरपूरकडून चोपड्याकडे जात होतो.

अजनाड बंगल्याजवळ त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला पोलिस पाटील राजेंद्र सातकर यांनी शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. वॉर्डबॉय प्रविण पाटील यांच्या माहितीवन थाळनेर पोलिसात नोंद झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com