ट्रकची दुचाकीला धडक, पत्नी ठार ; पतीसह तिघे गंभीर

ट्रकची दुचाकीला धडक, पत्नी ठार ; पतीसह तिघे गंभीर

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शेतात स्वयंपाक करून मुलांना डबा घेवून दुचाकीने घराकडे जाणार्‍या शेतकरी कुटुंबावर काळाचा झडप घातली. त्याच्या दुचाकीला विंचुर शिवारात भरधाव ट्रकने उडविले. त्यात पत्नी जागीच ठार झाली तर पतीसह दोन्ही मुले असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रक सोडून चालक फरार झाला. त्यांच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भालचंद्र बंडु पगारे, अलकाबाई भालचंद्र पगारे (वय 48), लहान मुलगी कावेरी व पुतणी दिव्यांगी सर्व (रा. विंचुर ता. धुळे) हे चौघे आज दि. 17 रोजी विंचुर शिवारातील शेतातील घरी होते. अलकाबाई यांनी शेतात स्वयंपाक करून मुलांना घबा घेवून जाते असे सांगितले.

त्यामुळे चौघे सकाळी साडेदहा वाजता लुना दुचाकीने (क्र. एमएच 18 एआर 2760) गावातील घरी जाण्यासाठी निघाले. चाळीसगाव रोडने जात असतांना त्यांना चाळीगावकडून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने (क्र. एचआर 55 एएच 2762) मागावून जोरदार धडक दिली.

त्यात चौघे रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. तर अलकाबाई यांच्या कमरेवरून ट्रकचे पुढील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी चौघांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून अलकाबाई पगारे यांना मृत घोषित केले. तर तिघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना शहरातील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी समाधान भालचंद्र पगारे (वय 33) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com