राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या कारला अपघात

भोसलेंसह 5 जखमी
राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या कारला अपघात

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मुंबई- आग्रा महामार्गावरील चांदवडनजीक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या कारला आज पहाटे अपघात झाला. या अपघातात सुदैवाने रणजीत भोसलेंसह पाचही जण किरकोळ जखमी झाले.

राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, महेंद्र शिरसाठ, राज कोळी, राजेंद्र चौधरी व चालक किरण पाटील हे पाच जण कारने (क्र. एम.एच.18 बी.एच.2157) मुंबईला गेले होते. मंत्रालयातील आणि इतर खाजगी कामे आटोपून ते रात्री धुळ्याकडे निघाले.

वाहतुक कोंडीमुळे त्यांना धुळ्याकडे यायला उशिर झाला. चांदवड नजीक एका वळण रस्त्यावर त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार तीनदा पलटी होत शेतात जावून उलटली.

त्यानंतर रणजित भोसले हे कारच्या काचा फोडून कसे बसे बाहेर पडले. रस्त्यावर धावत जात मदतीसाठी त्यांनी वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान रस्त्यावरून जाणारी धुळ्यातीलच गाडी थांबली.

तसेच टोल नाक्यावरील कर्मचारी देखील मदतीसाठी आले. त्यांनी जखमींना चांदवडच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर घटनेची माहिती कळताच धुळ्यातून भोसले यांचे कार्यकर्ते चांदवडला पोहचले.प्राथमिक उपचारानंतर सर्वांना धुळ्यात आणण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com