खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी अपघातात तरूण ठार

खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी अपघातात तरूण ठार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा अपघात होवून तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत नरडाणा पोलिसात नोंद झाली आहे.

मनोज भिका शिंपी (वय 40 रा. जिजाऊ नगर, ढेकू रोड, अमळनेर जि. जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो गेल्या बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच 19 डीपी 1216) मित्र अमोल पाठक यांच्यासह नरडाणाकडून अमळनेरकडे घरी जात होता.

त्यादरम्यान बेटावद गावाजवळील रस्त्यावरील खड्डा वाचवितांना त्याचा ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या खाली उतरवून अपघात झाला. त्यात मनोज हा गंभीर जखमी झाला.

त्याला अमोलसह रस्त्याने जाणार्‍या लोकांनी बेटावद ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथून धुळे येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतांना त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.

भरत भिका शिंपी यांच्या माहितीवरून नरडाणा पोलिसात नोेंद करण्यात आली आहे. तपास पोहेकाँ धनगर करीत आहेत. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com