विचित्र अपघातात बडोद्यातील दुचाकीस्वार ठार

विचित्र अपघातात बडोद्यातील दुचाकीस्वार ठार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

सुरत-नागपूर महामार्गावरील डुक्करझिरे गावानजीक विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुचाकीच्या धडकेनंतर खाली पडल्याने त्याला भरधाव ट्रकने चिरडले.

काल दुपारी हा अपघात झाला. याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

नरेंद्र सुरेश जाधव (वय 43 रा. बडोदा) असे मयताचे नाव आहे. ते काल दि. 30 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास किशोर धनराज भदाणे (वय 31 रा. नेर ता. धुळे) यांच्यासह दुचाकीवर (क्र. जीजे 06 बीजे 5577) मागे बसून धुळ्याकडे येत होते.

महामार्गावरील डुक्करझिरे गावानजीक त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणार्‍या दुचाकीने (क्र. एमएच 18 एएल 0598) धडक दिली.

त्यामुळे नरेंद्र जाधव हे खाली पडले. त्याच दरम्यान मागून येणार्‍या ट्रकने त्याना चिरडले. त्यात ते जागीच ठार झाले.

अपघातानंतर धडक देणारा दुचाकीस्वार गाडी जागीच सोडून पळुन गेला. अशी फिर्याद किशोर भदाणे यांनी साक्री पोलिसात दिली आहे. त्यावरून फरार दुचाकी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com