अपघातातील जखमी पिता-पुत्राचा मृत्यू

अपघातातील जखमी पिता-पुत्राचा मृत्यू
file photo

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मुंबई- आग्रा महामार्गावरील लळींग गावानजीक भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात पिता-पुत्र ठार झाले. तर आईसह दोन्ही मुली जखमी झाल्या. शनिवारी दुपारी हा अपघात झाला. याप्रकरणी कार चालकावर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

इम्रान मोहम्मद गुरफान अन्सारी (वय 40), साद इम्रान अन्सारी (वय 6 रा. नॅशनल हायस्कूल जवळ, धुळे) अशी मयत पिता-पुत्रांची नाव आहेत. तर सायमा इम्रान अन्सारी (वय 32), मुलगी सारिया (वय 11), सहारा (वय 15) हे जखमी झाले आहेत. हे पाचही जण शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच 41 यु 9064) जात होते.

लळींग गावाजवळील गतिरोधकाच्या पुढे समोरून येणार्या भरधाव कारने (क्र. एमएच 04 डीबी 8184) त्यांना जोरदार धडक दिली. त्यात पिता-पुत्र गंभीर जखमी झाल्याने त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मु्नतार अहमद गुलाम अलजी यांच्या फिर्यादीवरून कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ दराडे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com