धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहराजवळील चितोड ते रावेर रस्त्यावर गुरांच्या कळपातील रेड्याने दुचाकीला धडक दिल्याने खाली पडून जबर जखमी झालेल्या दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी ही दुर्देवी घटना घडली.

आर्यन उर्फ दिप आशिष मदने (रा. सप्तश्रृंगी कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे) असे मयत बालकाचे नाव आहे. नितीन वाघमोडे हा आपल्या दुचाकीने (क्र. एमएच 18-बी.3यु.1959) मामी आणि भाचा आर्यन उर्फ दिप आशिष मदने यांना घेवून चितोड येथून रावेरकडे जात होता.

त्यादरम्यान रस्त्यावरील कृष्ण मंदिर जवळ समोरुन गुरांचा कळप येत असतांना दिसल्याने नितीन याने दुचाकीचा वेग कमी केला.

त्याचवेळी अचानक कळपातील एक रेड्याने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे सर्व जण खाली पडले. त्यात आर्यनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

नातेवाईकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.