धुळे - Dhule - प्रतिनिधी :

सुरत-नागपूर महामार्गावरील दहीवेल गावाच्या शिवारात भरधाव ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरूण ठार झाल्याची घटना काल घडली. याप्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर शांताराम भोये (वय 22 रा. झंझाडे ता. साक्री) असे मयताचे नाव आहे. तो काल दि.29 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मोटरसायकलीने (क्र. एमएच 41- एल 332) दहीवेलहुन पेट्रोलपंपाकडे जात होता.

त्यादरम्यान दहिवेल गावाच्या पुढे बापु उखा माळी याच्या शेताच्या समोर सुरतकडून साक्रीकडे जाणार्या भरधाव टेलर वाहनाने (क्र. जी.जे.12- बी.टी.2856) जोरदार धडक दिली.

त्यात दुचाकीस्वार सागर शांताराम भोये हा जबर जखमी त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टेलर वाहन सोडून चालक पसार झाला. याप्रकरणी छगन गवरचंद बागुल यांच्या फिर्यादीवरून टेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.