धुळे - Dhule - प्रतिनिधी :

भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दिलेल्या महिला ठार झाल्याची घटना काल दुपारी घडली. अपघातप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अलकाबाई दगडु खोंडे (वय 48 रा. वाडीभोकर, वलवाडी, धुळे) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या काल दि. 28 रोजी दुपारी मुलगा दीपक (वय 31) यांच्यासोबत दुचाकीवर (क्र. एमएच 18 बी.एस 2574) डबलसीट बसुन जात होत्या.

त्यादरम्यान देवपूरातील तुळशीराम नगरातील रिक्षा थांब्याजवळ त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणार्या टॅ्रक्टरने (क्र. एमएच 41 एए 8179) जोरदार धडक दिली.

त्यात अलकाबाई या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले.

याप्रकरणी दीपक खोंडे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक बापु पुना गोपाळ (रा. कदमबांडे नगर, देवपूर, धुळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.