धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मालेगाव-चाळीसगाव चौफुलीजवळ दुचाकी व ट्रॅक्टर अपघात झाला. या अपघातात येथील पंचायत समितीत कार्यरत असलेले शाखा अभियंता ठार झाला.

भरत रामदास बागुल (वय48) हे मयत अभियंताचे नाव आहे.येथील पंचायत समितीत शाखा अभियंता म्हणून भरत रामदास बागुल हे कार्यरत होते.

ते मालेगाव येथील रहिवासी असल्याने दररोज मोटार सायकलीने ये-जा करीत होते. काल सांयकाळी कार्यालयाचे काम आटोपून घराकडे मोटार सायकलीने जात असतांना मालेगाव-चाळीसगाव चौफुलीजवळ ट्रॅक्टरने त्यांच्या मोटार सायकलीला धडक दिली. त्यात भरत बागुल यांचा जागीच मृत्यू झाला.