धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळे शहरापासून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या अजंग गावानजीक आज ट्रकची समोरा समोर धडक झाली.

यात एकजण ठार झाला. अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

जळगावहून धुळ्याकडे जाणार्या ट्रकची जळगावकडे जाण्यार्या ट्रकशी समोर जोरदार धडक झाली. यात पप्पू उर्फ रामाशंकर सरोज (वय 28) रा.मुंबई याचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.

अपघात इतका भिषण आहे की, दोन्ही वाहनांच्या समोरील भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनांचे काही भाग तुटून रस्त्यावर विखुरले गेले आहेत. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची तालुका पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.