धुळे : शिरपूरात आणखी दोन पॉझिटिव्ह : दोघे एसटी बस चालकाचे आई- वडील
धुळे

धुळे : शिरपूरात आणखी दोन पॉझिटिव्ह : दोघे एसटी बस चालकाचे आई- वडील

Balvant Gaikwad

धुळे –

आताच जिल्हा रुग्णालय येथील आलेल्या २३ अहवालानुसार उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. सदरील व्यक्ती हे परवा पॉजिटिव्ह आलेल्या पाटीलवाडा शिरपूर येथील एसटी बस चालक रुग्णाच्या संपर्कातील त्याचे ७१ वर्षीय वडील व ६९ वर्षीय आई आहेत. दोन्ही रुग्ण उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे ऍडमिट आहेत.

उर्वरित अहवाल हे रतनपुरा व वडेलचे १६, धुळे शहरातील ३, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील २ अहवाल असे एकूण २१ निगेटिव्ह आहेत. जिल्हात कोरोना बाधिताची रुग्ण संख्या आता एकूण १२० झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com