देशदूत व रोटरी क्लब क्रॉसरोडने साजरा केला योग दिनाचा इव्हेंट

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांनी दिले योगाचे धडे
देशदूत व रोटरी क्लब क्रॉसरोडने साजरा केला योग दिनाचा इव्हेंट

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

21 जून.. जगभरात योगाचा महोत्सव साजरा होत असतांना या वैश्विक उपक्रमाचा एक अंश म्हणून दै.देशदूत आणि रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड यांनीही यात सहभाग नोंदविला. पूज्य श्रीश्रीश्री रविशंकरजी प्रणित आर्ट ऑफ लिव्हींगच्या साधकांनी योगाचे धडे दिलेत.

शहरातील पांझरा नदी काठी असलेल्या व्यंकटेशन लॉन येथे आज सकाळी 7 वाजता कार्यक्रम घेण्यात आला. ऑनलाईन माध्यमातून देशदूत आणि रोटरीच्या पेजवर हा कार्यक्रम घेण्यात आला असला तरी या कार्यक्रमाला साधकांची आणि योग प्रेमींचीही मोठी उपस्थिती होती.

ऑर्ट ऑफ लिव्हींगचे साधक संतोष महाले आणि त्यांचे सहकारी सचिन लोंढे, दिलीप कुटे, राहुल लोंढे यांनी योगाचे धडे दिले. रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडचे अध्यक्ष महेश शिंदे, प्रोजेक्ट चेअरमन सचिन राठोड, दै.देशदूतचे ब्युरोचिफ अनिल चव्हाण, छायाचित्रकार गोपाळ कापडणीस, रोटरी फेमीनाच्या अध्यक्ष कल्पना अहिरे, श्वेता देशपांडे, प्रा.सतिष लोहालेकर, रोटरीचे माजी अध्यक्ष दिपक भावसार, डॉ.विशाल वाणी यांच्यासह साधक आणि योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशदूत आणि रोटरी क्लबऑफ धुळे क्रॉसरोडच्या माध्यमातून कोरोनाकाळात जनप्रबोधनाचे विविध उपक्रम राबविण्यात आले. नुकताच ‘एक पाऊल निरोगी आयुष्याकडे’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यास उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जागतीक योगदिनाच्या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने सहभाग घेवून योग प्रसार आणि प्रचाराच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यात आला.

आर्ट ऑफ लिव्हींगच्या साधकांनी यासाठी दिलेला प्रतिसाद अनमोल ठरला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात अतिषय सकारात्मक व आनंदी उर्जेतून घेण्यात आलेला योग वर्गाचा हा कार्यक्रम म्हणजे उपस्थित आणि दर्शकांसाठी खर्‍या अर्थाने मेजवानी ठरला. या कार्यक्रमाला शेकडो योग प्रेमींनी ऑनलाईन हजेरी लावून उत्तम प्रतिसाद नोंदविला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com