डेंग्यूने दोन जणांचा बळी ; आयुक्तांनी आरोग्य विभागाला धरले धारेवर

डेंग्यूने दोन जणांचा बळी ; आयुक्तांनी आरोग्य विभागाला धरले धारेवर
dhule municipal corporation

धुळे Dhule। प्रतिनिधी

शहरात डेंग्यूने (Dengue) दोन जणांचा बळी (kills) गेला आहे. तरी देखील आरोग्य विभागात उदासिनता दिसून आल्यामुळे आयुक्तांनी (commissioner) आरोग्य विभागाला (health department) धारेवर धरुन खडेबोल सुनावले. परंतू आरोग्य अधिकारी मात्र बैठकीत निरुत्तर झाले.

डेंग्यूने साक्री रोडवरील वैद्य नगरात आणि अजून एका बालिकेचा बळी गेला आहे. तरी देखील आरोग्य विभागाला याबाबत सक्षम माहिती नसल्याचे पुढे आले आहे. आरोग्य विभाग उदासिनता दाखवित असल्यामुळे आयुक्त देविदास टेकाळे हे संतप्त झाले. वैद्य नगरात बालकाचा बळी गेल्यानंतर धुरळणी व फवारणी करण्यात आली. या अगोदर जर आरोग्य विभागाने दखल घेतली असती तर बालकाचा डेंग्यूने बळी घेतला नसता.

आरोग्य विभागाला आयुक्तांनी खडेबोल सुनावले. यापुढे कामचुकारपणा करणार्‍यांची गय केली जाणार नाही. आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी, दोन सहाय्यक आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी हे जबाबदार अधिकारी असतांना आरोग्य विभाग नियोजन का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांच्याकडे आयुक्तांनी बालकाच्या बळीबाबत चौकशी केली असता डॉक्टर निरुत्तर झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com