बाधितांचे पुनर्वसन करा !
धुळे

बाधितांचे पुनर्वसन करा !

चित्तोड उपनगरातील ग्रामस्थांची मागणी ; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरानजीक असलेल्या चित्तोड येथील मोतीनाला व हागर्‍या नाल्याला आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाइ द्यावी. तसेच बाधित कुटुंबांचे पुर्नवसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसे निवेदन जिल्हाप्रशासनाला देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, चित्तोड ते धुळे रस्त्यावर मोती नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. तशाच उंचीचा पुल सुरत बायपासवर देखील पुर्वी होता. त्यामुळे वरील दोन्ही नाल्यांना कितीही पुर आला तरी पाण्याचा निचरा सहज होत होता. परंतु सुमारे तीन ते चार वर्षापुर्वी सुरत ते नागपुर या चार पदरी रस्त्याचे रस्त्याचे काम सुरू झाले. त्यावेळी चित्तोड चौफुली लगत पुल तोडण्यात आला व कामाची सुरूवात करण्यात आली.

चौपदरी रस्त्याचे काम करित असतांना चितोड चौफुली येथे उड्डयाण पुलाचे बांधकाम सुरूवात करतांना रस्त्याच्या बाजुने सर्व्हीस रस्ता तयार करण्यात आला. हा सर्व्हीस रोड पुर्वी त्या ठिकाणी असलेला पुल तोडून करण्यात आला. तसेच सदर सर्व्ही रोड हा तीन पाईप मोरी टाकुण करण्यात आला. परिणामी गेल्या 15 दिवसापुर्वी दोन्ही नाल्यांना महापुर आला. सर्व्हिस रोडच्या पाईप मोरीमुळे पुर्ण पाण्याचा निचरा झाला नाही. पुराचे पाणी चितोड येथील खालचे गाव भागात घुसल्याने तेथील घरांचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले.

घरातील वस्तु, अन्नधान्य हे पुरात वाहुन गेले. त्याचा रितसर पंचनामा करून करून नुकसा भरपाई मिळावी म्हणून मंडळ अधिकार्‍यांमार्फत प्रशासनास प्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच पाईप मोरी रस्त्यावर पुन्हा दोन नविन पाईप टाकण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी कसा बसा आपला संसार नव्याने थाटला असतानाच त्याच दोन्ही नाल्यांना पुन्हा दि. 24 जुलै रोजी महापुर आला. आणि पुर्वी पेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येकाच्या घरात 5 ते 7 फुटापर्यंत पाणी साचले. त्यामुळे कच्या घरांची पडझड झाली. काही प्रमाणात असलेली पक्की घरे यांना मोठ्या प्रमाणावर हादरा बसुन भिंतीना तडे गेले व पाया खचला आहे. तसेच वस्तु व अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

पुर्वी आलेल्या पुरापेक्षा या पुरामुळे बाधीत झालेल्या कुटुंबांची संख्येत वाढ झाली आहे. तरी योग्य ती नुकासान भरपाई मिळावी. तसेच चौपदरी करणाचे काम बंद असल्याने उद्भवलेली परिस्थिती पुन्हा येवू शकते. व भविष्यात प्राणहानी होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाधितांचे पुर्नवसन करावे.

चौपदरीकरण करित असतांना संबंधित प्रशासकीय यंत्रणा व रस्ता बांधकाम ठेकेदार यांनी चुकीचे नियोजन केले असल्याने त्यांची चौकशी होवुन आम्हाला नुकसान भरपाई व नविन पुर्नवसन करण्यात यावे. चितोड गाव हे हद्दवाढीमुळे महानगरपालिका क्षेत्रात येते. सध्या आमची जि.प.च्या मराठी शाळेत तात्पुरती निवार्‍याची सोय केली आहे. तसेच सदर पाईप मोरी रस्त्यावर पाईपांची संख्या वाढवून व पाईप मोरी रस्त्याची उंची कमी करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर बापु बागुल, नंदु बैंसाणे, गौतम गायकवाड, संतोश बागुल आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com