शिरुडजवळ बोरी नदीवरील पुलाचे लोकार्पण

शिरुडजवळ बोरी नदीवरील पुलाचे लोकार्पण

तालुक्याचा नियोजनबध्द विकास - आ.कुणाल पाटील

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिरुड जवळील बोरी नदीवरील पुलाचे आज आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नाबार्ड अंतर्गत या पुलाचे बांधकाम करण्यात आले.

या पुलामुळे धुळे आणि चाळीसगाव, भडगाव हे तीन तालुके आणि त्यातील गावे जोडली जाऊन दळणवळणाची गैरसोय दूर होणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.

धुळे तालुक्यातील शिरुडजवळून वाहत जाणार्‍या बोरी नदीवर पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी होत होती. त्यानुसार आ.कुणाल पाटील यांनी विशेष प्रयत्न करुन शासनाकडून सदर पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजुर करुन आणला होता.

दळणवळणाची गैरसोय दूर व्हावी म्हणून सदर पुल तातडीने पूर्ण करण्यात आला. आज दि. 31 जुलै रोजी या पुलाचे लोकापर्ण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य साहेबराव खैरनार हे होते. यावेळी शिरुडचे सरपंच गुलाबराव कोतेकर म्हणाले की , बोरी नदीवर पुल नसल्याकारणाने अनेक दुर्घटनांना सामोरे जावे लागत असे मात्र या पुलाच्या बांधकामामुळे वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

आ.कुणाल पाटील यांनी शिरुड गावाच्या विकासासाठी सुमारे 1 कोटीपेक्षा अधिक निधी दिला असल्याचे सरपंच कोतेकर यांनी यावेळी सांगितले.

साहेबराव खैरनार म्हणाले की, बोरी नदीवर शेतकरी व ग्रामस्थांच्या सोयीसाठी आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने ठिकठिकाणी पुल व के.टी.वेअर बांधण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी शासनाकडून त्यांनी निधीही उपलब्ध करुन दिला आहे.

आ.कुणाल पाटील म्हणाले की,धुळे तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेत असून नियोजनबध्दरित्या मूळ समस्यांकडे बारकाईने लक्ष असते. आपल्या तालुक्याचे रस्ते चांगले आहेत असे इतर तालुक्यातील जनतेने हेव्याने म्हटले पाहिजे त्यामुळे रस्ते विकासाला प्रथम प्राधान्य असते. बोरी नदीवर निमगुळ, विंचूरजवळ पुल मंजुर केला आता धामणगावजवळही पुल मंजुरीचे काम केले जाईल असे आ.पाटील यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल आणि त्यांच्या जीवनात क्रांती आणायची असेल तर तालुक्यातील शेती फुलविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. शिरुड परिसरात जवाहर ट्रस्टच्यामाध्यमातून सिंचन चळवळ राबविली. आणि या पुढेही तालुक्याच्या विकासासाठी सुत्रबध्दपणे विकास केला जाईल असे आ.पाटील यांनी सांगितले.

आ.कुणाल पाटील यांच्या विशेष पाठपुराव्याने शिरुडजवळील बोरीवरील पुलाच्या बांधकामासाठी एकूण 5 कोटी 50 लक्ष रुपयांची निधी मंजुर करण्यात आला होता.

190 मीटर लांबीच्या पुलाला एकूण 19 गाळे असून त्याच रस्त्यावर अतिरिक्त 1 गाळ्याचा पुल बांधण्यात आला आहे.सदर पुलाच्या बांधकामामुळे धुळे तालुका,चाळीसगाव तालुका, भडगाव तालुका ह्या तीन तालुक्यातील गावे जोडली जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com