मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटर मध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण

४० लाख रुपये देणगीतून प्रकल्पाची निर्मिती, माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल यांची वचनपूर्ती
मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटर मध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण

शिरपूर : shirpur

माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या ४० लाख रुपये देणगीतून मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटर मध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असून तालुक्यातील जनतेने पटेल परिवाराला धन्यवाद दिले आहेत. शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पवार यांच्या हस्ते ऑक्सीजन प्लांट चे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ.विक्रमसिंह बांदल तर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल माने, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, तहसीलदार आबा महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑक्सीजन प्लांट चे लोकार्पण मंगळवारी दि.२७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले. यावेळी 

अभियंता ईश्वर पाटील, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटरचे डॉ.अमित गुजराथी, डॉ. पराग पाटील, डॉ.अतुल बडगुजर, डॉ.सुदीप सिसोदे, डॉ.गुंजन पाटील, डॉ.विजय अग्रवाल, सचिन सुर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण म्हणाले की, शिरपूर वरवाडे नगरपरिषद संचलित मुकेशभाई पटेल टाऊन हॉल मध्ये सुरु करण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये पटेल परिवाराचे दातृत्व व योगदानातून व सुमारे ४० लाख रुपये आर्थिक देणगीतून ऑक्सिजन निर्मितीचा हा मोठा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

यामुळे ३० ते ३२ मोठे सिलेंडर एवढ्या क्षमतेने दररोज ऑक्सिजन निर्मिती होऊन रुग्णांसाठी उपलब्ध होईल. मुकेश पटेल जम्बो कोबड सेंटरमध्ये शासकीय दरात रुग्णांसाठी खाजगी डॉक्टर्सच्या मदतीने वैद्यकीय सेवा देण्यात येत असून रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी व गरजेपोटी ऑक्सिजन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल.

रुग्णांना दिलासा देणार्‍या या ऑक्सिजन प्लांटची उभारणी केल्याबद्दल पटेल परिवाराचे तमाम शिरपूर तालुक्याच्या जनतेच्या वतीने आभार मानतो. मुकेश पटेल टाऊन हॉलमध्ये उभारण्यात आलेला ऑक्सिजनचा मोठा प्रकल्प व शिरपूर वरवाडे नगर परिषदेने गेल्या नऊ वर्षांपूर्वी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उभारलेला ऑक्सिजन प्रकल्प यामुळे रुग्णांना संजीवनी मिळणार आहे. गेल्या ३५ वर्षांपासून शिरपूर तालुक्यातील जनतेची सेवा सुरू असून माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या निःस्वार्थ, अतुलनीय कार्याला तमाम जनतेच्या वतीने मनापासून आभार.

एस.व्ही.के.एम.चे प्रकल्प अभियंता ईश्वर पाटील यांनी ऑक्सिजन प्लांट बद्दल तांत्रिक माहिती देताना सांगितले की, हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा हा प्रकल्प बाहेरून हवा कॉम्प्रेसर मध्ये ओढली जाऊन ती हवा एअर रिसिव्हर द्वारे एका टँक मध्ये गोळा केली जाईल. त्यानंतर एअर ड्रायरमध्ये हवा शुद्ध होऊन ती ड्राय युमिलिटी काढून शुद्ध हवा तयार होईल. हवेतील विषाणू बाहेर काढले जाऊन स्टोरेज ऑक्सिजन टॅंक मधून सेंट्रल लाईन पाईपद्वारे रुग्णापर्यंत शुद्ध ऑक्सिजन पुरविला जाईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com