धुळ्यात सायबर पोलिस ठाणे कार्यरत

पीआयसह 12 अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती
धुळ्यात सायबर पोलिस ठाणे कार्यरत

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

नवीन वर्षारंभापासून शहरातील पोलिस अधिक्षक कार्यालयात सायबर पोलिस ठाण्याच्या कामाकाजाला सुरूवात झाली आहे. यासाठी पोलिस निरीक्षकासह 12 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्त करण्यात आली आहे.

माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये दाखल ज्या तांत्रिक गुन्ह्यांमध्ये आरोपी सज्ञान आहे व पोलिस ठाणे पातळीवर आरोपी निष्पन्न करणे शक्य नाही, असे तांत्रिकदृष्या क्लिष्ट गुन्हे हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात येतील.

स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यामध्ये तांत्रिक मदत व मार्गदर्शन करण्यात येईल.

याबरोबरच सोशल मिडीयावरून ओळख चोरी करून किंवा हॅकींग करून अश्लील कमेंट करणे, एटीएमकार्डसंबंधी 50 हजार रूपयांवरील फसवणूकीचे गुन्हे, बनावट वेबसाईट, रॅनसम वेअर अटॅक, औद्यागिक ईमेल फिशिंग, डॉस अटॅक, सायबर खंडणी, सायबर दहशतवाद, चाईल्ड पोर्नोग्राफी, ऑनलाईन शॉपिंग संबंधीत गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल होतील. अशी माहिती अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com