धुळे जिल्ह्यात 1 मेपर्यंत संचारबंदी

जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांचे निर्देश

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आज (दि.14) रात्री 8 वाजेपासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी व नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

या कालावधीत अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com