संचारबंदी असूनही धुळ्यात होतेय गर्दी

संचारबंदी असूनही धुळ्यात होतेय गर्दी

भाजी-फळविक्रेत्यांनी आयुक्तांच्या आदेशाला दाखविली केराची टोपली, स्थलांतरित जागेवर भरत नाही बाजार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 1 मे पर्यंत संचारबंदी व जमाव बंदी आदेश लागू केला आहे. परंतु हा आदेश झुगारुन शहरात गर्दी होत आहे.

तर भाजी व फळ विक्रेत्यांना आयुक्तांनी स्थलांतराचे आदेश दिले आहेत. पण हे आदेश कागदावरच असून एकही विक्रेत्याने स्थलांतर केलेले नाही.

त्यामुळे पहिल्यासारखीच गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी कशी तुटेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. रोज 400 ते 500 कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे प्रशासनाने राज्य शासनाने लागू केलेली नियमावली व निर्बंध शहरात लावले आहेत. परंतु हे सर्व निर्बंध नागरिकांनी धाब्यांवर बसविले आहेत.

बाजारपेठेत गर्दी होत आहे. खरेदीसाठी येणारे तोंडाला मास्क लावत नाहीत. तसेच सोशल डिस्टन्स पाळत नाही. विक्रेतेही नियमावली पाळत नाही. यामुळे करोनाचे रुग्ण वाढत आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेचे आयुक्त अजिज शेख यांनी भाजी व फळ विक्रेत्यांना स्थलांतराचे आदेश दिले होते. परंतु एकाही विक्रेत्याने स्थलांतर केलेले नाही. आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.

विक्रेत्यांमुळे सर्वच चौकांमध्ये गर्दी होत आहे. परंतु या विक्रेत्यांवर महापालिकेतर्फे कुठलीही कारवाई होत नाही. केवळ आदेश देवून उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणी करणे हे महापालिकेचे काम आहे. परंतु केवळ कागदी घोडे नाचवूून करोनाची संख्या घटणार नाही.

तर त्यासाठी कृतीची गरज आहे. भाजी व फळ विक्रेत्यांना स्थलांतराचे आदेश देवून आठवडा उलटला तरी देखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. कोरोनाची साखळी खर्‍या अर्थाने तोडायची असेल तर महापालिकेच्या अधिकार्‍याने रस्त्यावर आले पाहिजे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com