रामी शिवारात जैन मंदिरात दर्शनासाठी गर्दी

रामी शिवारात जैन मंदिरात दर्शनासाठी गर्दी

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

शहरापासून दोन किलोमीटरवर असलेल्या रामी येथे जैन मंदिर बघण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी होत आहे.

रामभाऊ माळी यांच्या शेतात काल शेतीचे मशागत करत असतांना दिगंबर माळी यांना जैन समाजाचे आराध्य दैवत श्री महावीर भगवान यांचे दोन फूट उंचीचे मंदिर सापडले. खानदेशातील जैन समाज बांधवांनी मूर्ती बघण्यासाठी व दर्शन करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली होती. धुळे व नंदुरबार, शाहदा, शिंदखेडा येथील जैन बांधवांनी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना निवेदन देवून शेतात सापडलेल्या मूर्तीची मागणी केली.

मूर्ती सापडल्यानंतर कायदेशीर प्रकिया करण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, शाहदा, शिंदखेडा येथील जैन समाज बाधवांनी माझी भेट घेतली. धुळे, नंदुरबार येथील बांधवांनी निवेदन देखील दिले आहे. मात्र पुरातन विभाग नाशिक यांना कळविण्यात आले आहे. मात्र त्यांच्या कडे मनुष्यबळ कमी असल्याने दि.25 रोजी सदर मूर्ती नाशिकला पाठविण्यात येणार आहे.

पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी

दि. 23 रोजी रामी ता. शिंदखेडा शिवारात महादेव मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका शेतीची मशागत सुरू असतांना एक मिश्रीत धातूची मूर्ती मिळून आली होती. स्थानिक पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती पोलिस निरिक्षक दुर्गेश तिवारी व अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना कळविण्यात आले. त्यानंतर मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री यांनी पंचनामा केला.

सदर मूर्ती ही दोन हजार वर्षीपुर्वीची जैन समाजाचे आराध्य दैवत श्री महावीर भगवान यांची मिश्रीत धातूची बनलेली, कोरीव नक्षीकाम केलेली मूर्ती मुकूट सापडले.मुर्तीमुकूट पाहण्यासाठी सोमवारी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

मूर्तीची पाहणी

अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी दि. 24 रोजी शेतात पाहणी केली आहे. त्यावेळी मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री, वाहन चालक युवराज माळी आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com