धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने साक्री तालुक्यातील व्हेरगाव शिवारातील गोकुळ नगरीत एका घरात रूग्णाची तपासणी करतांना बोगस डॉक्टरला पकडले.

त्यांच्याकडून चार हजारांची औषधी व रूग्ण तपासणीचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश्वर पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्यासह पथकाने काल दि. 25 रोजी सायंकाळी विहिरगाव शिवारातील गोकुळनगरीत नाना काशिराम बाचकर यांच्या घरी रूग्ण तपासतांनाच नयनसिंग दिलीपसिंग गिरासे (वय 38 रा. रामी ता. शिंदखेडा ह.मु व्हेरगाव ता.साक्री) यांना पकडले.

त्यांच्याकडून 3 हजार 890 रूपये किंमतीचे अॅलोपॅथिक मेडिसीन व इजे्नशन व रूग्ण तपासणीचे साहित्य जप्त करण्यात आले.

गिरासे हे कोणतेही अधिकृत वैद्यकीय पात्रता नसतांना व वैद्यकीय व्यवसाय संबंधी वैद्यकीय परिषदेकडे नोंद केलेली नसतांना रूग्ण तपासतांना मिळून आत्याने त्याच्याविरोधात निजामपूर पोलिसात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.