धुळे | प्रतिनिधी Dhule

जिल्ह्यात आजपासून कोविड १९ लसीकरण मोहिमेस सुरवात झाली. जिल्हारुग्णालयातील लसीकरण केंद्रात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी प्रथम लस टोचून घेतली.

यावेळी जि. प.च्या आरोग्य सभापती मंगला पाटील, जिल्हाधिकारी संजय यादव, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माणिक सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.मनीष पाटील, डॉ.संजय शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, कापडणे, (ता.धुळे) येथील अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांना लस देण्यात आली. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण दहा हजार १७० आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांची नोंद झाली आहे. त्यासाठी कोविशील्ड या लसीचे १२ हजार ४३० डोस जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. यामध्ये धुळे महापालिकेला ५ हजार २५० डोस, उपजिल्हा रुग्णालय शिरपूरला तीन हजार २६० डोस व ग्रामीण रुग्णालय साक्रीला तीन हजार ९२० डोस पुरविण्यात आले आहेत.