नकाणे येथील दाम्पत्याची गळफास घेवून आत्महत्या

नकाणे येथील दाम्पत्याची गळफास घेवून आत्महत्या

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरानजीक असलेल्या वाडीभोकर गावातील पंप हाऊसमध्ये दाम्पत्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रवींद्र विक्रम मोरे (वय23) आणि नयनाबाई रवींद्र मोरे (वय21) दोघे रा. नकाणे हे मयत दाम्पत्याचे नाव आहे.

नकाणे, ता. धुळे येथे राहणारे विक्रम आनंदा मोरे हे वाडीभोकर येथील शेतात काम करीत होते. त्यावेळी त्यांचा मुलगा रवींद्र विक्रम मोरे आणि सुन नयनाबाई रवींद्र मोरे हे दोघेजण जेवणाचा डबा घेवून शेतात आले होते. डबा देवून ते दोघे जण घरुन जेवण करुन येतो असे सांगून गेले.

मात्र दुपारी 4 वाजेपर्यंत परत न आल्याने त्यांना पाहण्यासाठी विक्रम मोरे व लहान मुलगा सुरेश हे दोघे जण गेले. तेव्हा त्यांना वाडीभोकर गावाची पाणीपुरवठा विहिरीच्या बाजूला असलेल्या पंप हाऊसमध्ये रवींद्र आणि नयनाबाई यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

दाम्पत्याला खाली उतरवून हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून रवींद्र व नयनाबाई यांना मृत घोषीत केले. एकाच वेळी दाम्पत्याने गळफास घेतल्याने नकाणे गावावर शोककळा पसरली. दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com