पाच ठिकाणीच होणार 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण

पाच ठिकाणीच होणार 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात पाच केंद्रावरच 18 ते 44 गटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटासाठी 7 हजार 500 डोस प्राप्त झाले आहे.

एका केंद्रावर दररोज 200 जणांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंद करणे आवश्यक आहे.

देशभरात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातही त्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात नागरी आरोग्य केंद्र, प्रभात नगर, धुळे, उपजिल्हा रूग्णालय, दोंडाईचा, ग्रामीण रूग्णालय, साक्री, ग्रामीण रूग्णालय सोनगीर व शहरी आरोग्य केंद्र, शिरपूर या पाच केंद्रांवरच या वयोगटासाठी लसीकरण केले जाणार आहे.

यासाठी 7 हजार 500 डोस प्राप्त झाल्या असून प्रति लसीकरण केंद्र 1500 डोस देण्यात येणार आहे. तर एका केंद्रावर दररोज 200 जणांनाच लस दिली जाणार आहे.

या लस साठा इतर वयोगटासाठी वापरण्यात येवू नये, याची दक्षता घ्यावी, अशा सुचना जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांनी लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com