आला तेव्हा आजार...आता होतोय बाजार ?
धुळे

आला तेव्हा आजार...आता होतोय बाजार ?

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

सर्दी, खोकला, ताप झाला म्हणजे खुप मोठा गुन्हा असल्यासारखे रुग्णाकडे बघीतले जात आहे. त्यातल्या त्यात निमोनियासह तापाशी निगडीत अन्य आजारांच्या रुग्णांची हेळसांड होत असून कोरोनाच्या नावाखाली काही ठिकाणी होत असलेली लूट तत्काळ थांबायला हवी, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.

सध्या सोशल मिडीयावर कोरोनाशी निगडीत अनेक संदेश फिरत असून यापैकीच एक म्हणजे ‘तो आला तेव्हा आजार होता, आता त्याचा बाजार झालाय’ अशा एका संदेशचा समावेश आहे. ही गंमत किंवा शब्दांची जुळवा जुळव म्हणून सोडून द्यायचे म्हटले तरी या संदेशाला साजेसा अनुभव अनेक रुग्णांना येवू लागला आहे.

मुळात अजूनही अनेक खासगी डॉक्टर्स सर्दी, खाकला, तापाचे रुग्ण तपासत नसून निमोनिया झाला म्हणजे जणू कोरोनाच झाल्यासारखे त्यांना वागविले जात आहे. वेगवेगळ्या तपासण्या, त्यासाठी आकारले जाणारे अमाप शुल्क, रिपोर्ट बघून त्या दवाखान्यात जाण्याचे दिले जाणारे सल्ले, यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड, याचा मनस्ताप होणारा अनुभव रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येत असल्याचे अनेकांनी कथन केले आहे.

मुळात यापुर्वीही बाकी आजार किंवा साथीचे आजार होत असे. परंतु आता सगळ्याच रुग्णांकडे संशयाने बघणे कितपत योग्य? असा सवाल नागरिकांचा आहे. काळजी म्हणून केल्या जाणार्‍या अत्यावश्यक तपासण्या समजण्यासारख्या आहे. परंतु केवळ संशयीत असल्याचे सांगत होणार्‍या तपासण्या, त्यासाठी तासंतास करावी लागणारी प्रतिक्षा, पैसा खर्च करुनही संबंधितांच्या विणवण्या, अशा प्रकारांचा अनुभव रुग्णांना येतो आहे.

विशेष म्हणजे अजूनही बहुतांशी हॉस्पिटलमध्ये संशयीत रुग्ण दाखल करुन घेण्यास अक्षरशः टाळले जात आहे. कुण्या बड्या व्यक्तीची ओळख, वशीला आणि पैसा खर्च करण्याची तयारी दाखविल्यास काही ठिकाणी दाखल करुन घेत जात असल्याचेही नाव न सांगण्याच्या अटीवर ‘देशदूत’ DESHDOOT ला सांगण्यात आले. यामुळे जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय यावरील भार वाढत असून याठिकाणचे डॉक्टर्स, कर्मचारी, उपचार करणारे काही खासगी डॉक्टर्स यांचे कौतुकच केले पाहिजे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com