धुळे जिल्ह्यात करोनाने सात जणांचा मृत्यू
धुळे

धुळे जिल्ह्यात करोनाने सात जणांचा मृत्यू

जिल्हाची एकूण रुग्ण संख्या झाली ५ हजार ९७०

Rajendra Patil

धुळे - प्रतिनिधी Dhule

जिल्ह्यात आज एकाच दिवशी करोनाने सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान ६० वर्षीय पुरुष (सुलवाडे ता. शिंदखेडा), ३६ वर्षीय महिला वाठोडा (ता. शिरपूर), ६५ वर्षीय पुरुष साक्री मेनरोड, ६५ वर्षीय पुरुष देवभाने (ता.धुळे), ५५ वर्षीय पुरुष मोहाडी, धुळे, ७४ वर्षीय पुरुष सोनगीर (ता.धुळे) व खाजगी हॉस्पिटलमध्ये ७४ वर्षीय पुरुष (रा. देवपूर, धुळे) या करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

तसेच खाजगी लॅबमधील ४९ अहवालापैकी १८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शेलारवाड़ी, साक्री रोड, पुरुषोत्तम नगर देवपुर, मातोश्री मंगल कार्यालय जवळ, वैद्य नगर धुळे, विद्या नगर देवपुर, वर्षा बिल्डिंग जवळ देवपुर, चाळीसगाव रोड मोहाड़ी, विद्या नगर दोंडाइचा येथील प्रत्येकी एक व हेमंत देशमुख नगर दोंडाइचा २, कुमार नगर २, ग.द.माळी सोसायटी ३, वालचंद बापु नगर मोहाड़ीतील दोन रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हाची एकूण रुग्ण संख्या ५ हजार ९७० एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण १८८ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com