धुळ्यात कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

कनिष्ठ अभियंत्यासह तिघांवर गुन्हा, ठेकेदाराला अटक
धुळ्यात कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरातील अविष्कार कॉलनीत विजेचा शॉक (electric shock)लागून कंत्राटी कामगारांच्या (Contract worker) मृत्यू (dies) झाला होता. याप्रकरणी चौकशीअंती निष्काळजी व हलगर्जीपणा केल्याप्रकरणी विज कंपनीच्या कनिष्ठ अभियंता,(Junior Engineer) ठेकेदारासह (Contractor) तिघांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ठेकेदाराला अटक केली आहे.

आकाश प्रल्हाद रोकडे (वय 22 रा. प्रभातनगर, एसएसव्हीपीएस महाविद्यालयामागे, देवपूर, धुळे) असे मयताचे नाव आहे. याबाबत हेकाँ के.एन. वाघ यांनी चाळीसगाव रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत आकाश रोकडे हा वीज कंपनीमार्फत धुळे सबस्टेशन वडजाई रोड येथे पवन इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड सिव्हील कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्फत कंत्राटी कामगार म्हणून कामावर होता. तेव्हा तो दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी अविष्कार कॉलनीतील इलेक्ट्रीक पोलवर झुला घेवून काम करण्यासाठी गेला होतो. पोलवर चढून काम करून झुला काढत असतांना स्ट्रिट लाईटच्या वायरला त्याचा डावा हात लागला. त्यामुळे विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. याबाबत प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यावरून चौकशी करण्यात आली. चौकशीत वीज कंपनीचे धुळे सबस्टेशन वडजाई रोडचे कनिष्ठ अभियंता निरजकुमार व पवन इलेक्ट्रीक अ‍ॅण्ड सिव्हील कॉन्ट्रॅक्टर दिनेश कडु पगार (वय 32 रा. निलोप सोसायटी, पखाल रोड, व्दारका, नाशिक) अश्यांनी मयतास सुरक्षा साधने पुरविली नाहीत. तर वरिष्ठ तंत्रज्ञ तथा उपप्राचार्य दिगंबर धनालाल (रा. श्रमसाफल्य कॉलनी, वलवाडी शिवार, धुळे) यांनी कर्तव्यास कार्यालयात हजर असतांना अनुभवी कर्मचारी म्हणून कंत्राटी कामगारासोबत जाणे आद्य कर्तव्य असतांना देखील गेले नाही. वरील तिघांनी निष्काळजी व हलगर्जीपणा केल्याने हा प्राणांतिक अपघात घडला. याप्रकरणी वरील तिघावंर भादंवि कलम 304, 287, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत. दरम्यान पोलिसांनी काल रात्रीच ठेकेदाराला अटक केली.

Related Stories

No stories found.