दोंडाईचात 18 हजाराची लाच घेताना हवालदारास पडकले

नाशिक एसीबीची कारवाई
प्रातिनिधिक
प्रातिनिधिक

दोंडाईचा - श. प्र. Dondaicha

येथील पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करता सदर गुन्ह्यात ब वर्गात समरी पाठवण्यासाठी तडजोडी अंती १८ हजार रुपयांची लाच घेणार्‍या हवालदारला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

प्रातिनिधिक
मालेगाव बाँबस्फोटाचे तपासाधिकारी सीबीआयचे संचालक

नाशिकच्या पथकाने काल रात्री ही कारवाई केली. तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांविरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात, सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करता सदर गुन्ह्यात ब वर्गात समरी पाठविण्यासाठी पोलीस हवालदार विजय शंकरराव मोरे, (वय ५०) यांनी तक्रारदारा कडे दि.25 रोजी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार केली.

प्रातिनिधिक
Video किडनी विकार आणि उपाय

त्यानुसार काल रात्री एसीबीच्या पथकाने दोंडाईचा पोलिस ठाण्यात सापळा रचला. तडजोडीअंती 18 हजार रुपये लाचेची मागणी करून ती पोलीस स्टेशनच्या पाठीमागे रिकामे पोलिस कॉटर येथे स्वीकारताना पथकाने हवालदाराला रंगेहात पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक (वाचक नाशिक) विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, पोहवा सचिन गोसावी, पोहवा दिपक कुशारे, पोना एकनाथ बाविस्कर, पोना प्रकाश डोंगरे, चापोकॉ जाधव आदींनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com