हॉलमार्किगच्या विरोधात सराफ व्यावसायिकांचा बंद

धुळ्यात एक कोटींची उलाढाल ठप्प
हॉलमार्किगच्या विरोधात सराफ व्यावसायिकांचा बंद

धुळे Dhule । प्रतिनिधी

हॉलमार्किंग hallmarking प्रक्रियेच्या विरोधात against आज संपुर्ण ज्वेलर्स व सराफ व्यावसायिकांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला. त्यात शहरातील आग्रा रोडवरील ज्वेलर्स व सराफ व्यावयायीकांनीही Jewelers and goldsmiths दुकाने Strictly closed ठेवत संपात सहभाग घेतला. त्यामुळे सोने-चांदीचे खरेदीतून होणारी एक ते दीड कोटींची उलाढाल ठप्प Turnover stalled झाली आहे. महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आले.

देशभरात सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य झाला असला तरी त्याच्या अंमलबजावणीचे तीनतेरा वाजले आहेत. हॉलमार्किंगचा कारभार सरकारकडून मनमानी पद्धतीने केला जात असल्याचा आरोप करत सराफा व्यापार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. हॉलमार्किंग सक्तीच्या विरोधात आज शहरातील सराफ व्यावसायिकांकडून बंद पाळण्यात आला आहे. 60 ते 70 ज्वेलर्स व सराफ व्यावसायीक सहभागी झाले होते. त्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली. त्यामुळे सुमारे एक ते दीड कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

तोडगा काढण्याची मागणी

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती केली आहे. ही सक्ती अन्यायकारक असून, त्यामुळे सराफ व्यवसाय धोक्यात येईल, असे सराफ संघटनांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या सक्तीचा निषेध नोंदवण्यासाठी आज शहरातील सर्व सराफ व्यावसायिकांनी दुकाने, व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद आंदोलन केले. केंद्र सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी सराफ व्यापार्‍यांकडून करण्यात आली आहे.

अव्यवहारीक पध्दतीने लागू केलेल्या हॉलमार्कींग प्रक्रियेच्या विरोधात संपुर्ण ज्वेलर्स व सराफ व्यावसायिकांनी राज्यव्यापी लाक्षणिक बंद पुकारला आहे. आम्ही हॉलमाकिर्ंगचे स्वागत करतो परंतू एचयुआयडी अर्थात हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आम्हाला मंजूर नाही, आम्ही ज्वेलर्स आहोत, बीआयएसचे कारकुर नाही, असेही फेडरेशनने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com