नवीन कृषी कायद्यामुळे चिलाण्याची पपई राज्याबाहेर गेली

नवीन कृषी कायद्यामुळे चिलाण्याची पपई राज्याबाहेर गेली

दोंडाईचा । प्रतिनिधी

शिंदखेडा तालूक्यातील चिलाणे येथील पपई नवीन कृषी कायद्यामुळे राज्याबाहेर गेली.

चिलाणे गावात एकेकाळी पाण्याची मोठी समस्या होती. त्यामुळे आ. जयकुमार रावल यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविल्यानंतर आ. जयकुमार रावल यांनी शेतीसाठी सिंचनाच्या पाण्यासाठी प्रयत्न केले.

आ. रावल रोहयो मंत्री असतांना त्यांनी सिंचन विहिरीचा पायलट प्रोजेक्ट राबविला होता, त्याअंतर्गत शिंदखेडा तालुक्यात अनेक शेतकर्‍यांना सिंचनाची सोय झाली, चिलाणे गावातही अनेक शेतकर्‍यांना विहिरी मंजूर करून दिल्या, तापी नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेसचे काम झाल्यामुळे तापीत असलेले पाणी पाईपलाईनने आपल्या शेतापर्यंत आणले आणि पुर्ण बागायत करू लागले.

असाच एक युवा शेतकरी व भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण यांनी आपल्या शेतात पपईची लागवड केली आणि मोदी सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यामुळे पिकवलेली पपई ही आज अहमदाबाद, बंगलोर याठिकाणी जात आहे.त्यांना त्याचा मोठा भाव मिळत असल्याचे या शेतकर्‍याने सांगितले. आज आ.जयकुमार रावल यांनी रस्त्यावर थांबून या शेतीला भेट दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com