धुळे

धुळ्यात ट्रकसह गुरांचे चामडे जप्त

Balvant Gaikwad

शहरातील म्युनिसिपल कॉलनी, सिध्दीकीया नगर, भागातील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला एका पत्रटी गोडावूनमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले गोवंशाचे चामडे व ट्रक असा एकुण दहा लाख पाच हजारांचा मुद्यमाल जप्त करण्यात आला आहे. काल सायंकाळी एससीबीच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी एकाविरूध्द चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलिस निरीक्ष प्रकाश मुंडे, सपोनि उमेश बोरसे, पोसई अनिल पाटील, हनुमंत उगले, पोहेकॉ. सुनिल विचूरकर, पोना. श्रीकांत पाटील, नितिन मोहने, मायुस सोनवणे, चेतन कंखरे, किशोर पाटील, योगेश जगताप, विजय सोनवणे यांनी काल सायंकाळी तेथे छापा टाकत कारवाई केली.

तेथून 1050 गोवंशाचे चामडे प्राण्याच्या विविध रंगाचे व आकाराचे कातडे व ट्रक असा एकुण 10 लाख 5 हजारांचा मुद्यमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी जावेद ईकबाल मुजाहिद हसन (वय 37 रा. म्युनीसीपल कॉलनी सिध्दीकीया नगर, धुळे) याच्या विरुध्द चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com