धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील सुळे फाट्यावर काल सायंकाळी धुळ्यातील मोहाडी उपनगरातील तरुणाला सव्वा लाखांच्या गांजासह रंगेहाथ पकडण्यात आले.

याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील सुळे फाट्यावर बसस्टॉपजवळ काल दि. 24 रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास शिरपूर तालुका पोलिसांनी एकाला संशयास्पदरित्या गोण्या घेवून जातांना पकडले.

गोण्यामध्ये गांजा भरलेला मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले. राजेंद्र शंकर सोनवणे (वय 32) रा.दंडेवाला बाबा नगर, मोहाडी उपनगर असे त्याने नाव सांगितले.

त्याच्याकडून दोन वेगवेगळ्या गोण्यामध्ये भरलेला 26 किलो वजनाचा सुकलेला हिरवट रंगाचा पानाचा व काडयांचा चुरा उग्र वासांचा गांजा जप्त करण्यात आला.

त्याची किंमत 1 लाख 25 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोना पवन गवळी याच्या फिर्यादीवरून तरूणाविरुध्द गुन्हा दाखल करण्या आला आहे.