धुळे । प्रतिनिधी Dhule

जिल्ह्यात घरफोडी करणार्या टोळीतील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याकडून शेतातील झोपडीत चार्याखाली लपविलेला विविध गुन्ह्यातील चोरीचा 95 हजारांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जिल्हयात दाखल घरफोडी, चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरू असतांना विशाल धनराज भोये (रा. कडळी ता. साक्री) यास काही एक कामधंदा नसुन तो त्याचे साथीदारासह मागील एक महिन्यापासुन मौजमजा करीत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार आज दि. 7 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या माहिती नुसार संशयीत विशाल हा शेवाळी फाटा ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पथकाने शेवाळी फाटा येथे सापळा रचुन विशाल भोये यास ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने दिघावे व बल्हाणे (ता. साक्री) येथील न्यु इंग्लीश स्कुल या दोन्ही शाळेत त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याला चोरीतील मुद्येमालाबाबत विचारपुस केली असता त्याने हा त्याचे पापडीपाडा (ता. साक्री) येथे त्याचे मालकीच्या शेतातील झोपडीमध्ये चार्याखाली लपवुन ठेवले असल्याचे सांगितले. त्यानुसार 95 हजार 250 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. संशयीताला साक्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि संदिप पाटील, पोसई हनुमान उगले, पोहेकॉ रफिक पठाण, पोहेकॉ श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, पोना गौतम सपकाळे, पोकॉ राहुल सानप, सुनिल पाटील, पोकॉ श्रीशैल जाधव विलास पाटील, दीपक पाटील यांनी केली आहे.

मुद्देमाल जप्त

पथकाने विशाल भोये यांच्याकडून साक्री पोलीस ठाण्याम दाखल गुन्हयातील 43 हजार 500 रूपयांचा 55 इंची टिव्ही. 30 हजारांचा संगणक, सीपीयु, प्रिन्टर किबोर्ड व माऊस असा एकुण 73 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल व पिंपळनेर पोलिसात दाखल गुन्हयातील 18 हजार रूपये किंमतीचे 4 सी.पी.यु. व 3 हजार 750 रूपये किंमतीचे मॉनीटर असा एकुण 21 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्यमाल असा एकुण 95 हजार 250 रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.