धुळे

लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी गजाआड

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

बोगस प्रमाणके सादर केल्याने शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी नोटीस अदा केली होती. सदर कारवाई न करण्यासाठी शिंदखेडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी किरण यादवराव माने यांना 25 हजाराची लाच स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

याबाबत माहिती अशी की, शिंदखेडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी किरण यादवराव माने यांनी बोगस प्रमाणके सादर केल्याने शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी तक्रारदाराला नोटीस अदा केली होती. सदर कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची लाच माने यांनी तक्रारदारकडे मागितली. परंतु तडजोड करून 25 हजाराची लाच देण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करण्यात येवून पथकाने सापळा रचला. त्यावेळी माने यांना 25 हजाराची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले.

सदर कारवाई पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे, पोनि मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे, पोहेकॉ जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, शरद काटके, प्रकाश सोनार, सुधिर सोनवणे यांच्या पथकाने केली.

Deshdoot
www.deshdoot.com