धुळयात ब्रेक द चेनचे उल्लंघन

101 दुकानदारांना दंड
धुळयात ब्रेक द चेनचे उल्लंघन
USER

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

ब्रेक द चेन बाबतच्या आदेशाचे पालन न करणार्‍या शहरातील 101 दुकानदारांवर कारवाई करुन 42 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर विना मास्क फिरणार्‍यांविरुध्द 158 केसेस करुन 17 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती धुळे शहर उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांनी दिली.

ब्रेक द चेन याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी पोलिस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांना कामकाजाची वेळ ठरवून दिली आहे.

त्यानंतरही नागरिक विनामास्क आणि विनाकारण बाहेर फिरतांना आढळून येत आहेत. याशिवाय काही आस्थापना, नागरिक शासनाच्या आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसून येत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. पिंगळे यांनी म्हटले आहे.

धुळे शहर उपविभागातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जीवनाश्यक आस्थापना वगळता इतर आस्थापना, हॉटेल यांच्यावर कारवाई करण्यात येवून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

101 दुकान, आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन 42 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विना मास्क फिरणार्‍यांवर 158 केसेस करण्यात येवून 17 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विना कारण रस्त्यावर फिरणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 219 वाहन चालक यांच्यावर मोटार वाहन कायदा अन्वये केसेस करण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com