जेबापूर येथे धाडसी चोरी, 24 तोळे सोन्याचे दागिने लंपास

जेबापूर येथे धाडसी चोरी, 24 तोळे सोन्याचे दागिने लंपास

पिंपळनेर । वार्ताहर Pimpalner

साक्री तालूक्यातील पिंपळनेरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या जेबापूर येथे धाडसी चोरी होवून चोरट्यांनी 24 तोळे सोन्याचे दागिणे लंपास केले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गावाच्या वेशीपर्यंतच श्वानने दाखवला माग दाखविला.

पिंपळनेरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या जेबापूर येथे राहणारे अनिल विश्वासराव भदाणे हे नोकरीनिमित्त नाशिक येथे स्थायिक झाले असून त्यांची आई इंदुबाई विश्वासराव भदाणे या जेबापूर येथेच राहत होत्या मात्र तब्येत बिघडल्याने त्या आठ दिवसांपूर्वी नाशिक येथे उपचारासाठी मुलाकडे गेल्या.

त्यामुळे घर बंद होते. त्याचीच संधी चोरट्यांनी साधली व आज दि. 24 फेब्रुवारी रोजी पहाटे अनिल विश्वासराव भदाणे यांच्या ग्राम पंचायत शेजारी असलेल्या चौकातील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व कपाटे तोडून त्यातील 24 तोळे सोन्याचे दागिने त्यात नेकलेस, राणीहार,चैन, बांगड्या, अंगठी, पाटल्या, डबल गोपची सरी व इतर किरकोळ सोने असा एकूण 24 तोळे सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून पोबारा केला.

या घराजवळच शिवाजी रूपचंद भदाणे राहतात. ते घराचे कामावर पाणी मारण्यासाठी आले. त्या घरातून एक इलेक्ट्रॉनिक मोटर सुरू करण्यासाठी घराच्या दाराजवळ गेले असता दाराचे कुलूप तोडून खाली पडले दिसले त्यांनी आत प्रवेश केला असता ओसरी व मधल्या घरातील गोदरेज कपाट तोडलेले दिसले तसेच भिंतीत असलेल्या लाकडी कपाट ही तोडलेली आढळली. व कपाटातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसला.

त्यांनी पुतण्या भूषण भदाणे यांना माहिती दिली. ते आज दुपारी जेबापूर येथे आले. त्यात त्यांनी 24 तोळे सोने चोरीस गेल्याचे पिंपळनेर पोलिसांना सांगितले. धुळे येथून सायंकाळी चार वाजता श्वान पथक, फिंगरप्रिंट पथक, एलसीबी पथक, उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराळे, पिंपळनेर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येवून गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com