धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात रेमडिसीवर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरु आहे. गरजेचा लाभ उठवत जास्तीच्या दरात हे इंजेक्शन विकले जात आहे.

तसेच सरकारीसह खासगी रुग्णांलयांमध्ये बेडची व्यवस्था होणे देखील अंत्यत आवश्यक असल्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली.

मंत्री टोपे यांच्या धुळे दौर्यात त्यांची भेट घेवून मागणी करतांना निंबा मराठे, दुष्यंतराजे देशमुख, प्रदीप जाधव, विरेंद्र मोरे, नाना कदम, सुधीर मोरे, अर्जुन पाटील, संदीप शिंदे, रविंद्र शिंदे, अमर परताडे, विनोद जगताप, विकास मराठे, कुणाल पवार, हेमा हेमाडे, अनिता वाघ, शाम निरगुडे आदी उपस्थित होते.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बाधित व मृतांची वाढती संख्या विचारात घेवून नियोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.