भाजपातर्फे प्रदीप कर्पे महापौर पदाचे उमेदवार

नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपली, 17 रोजी विशेष महासभेत महापौर पदाची निवड
भाजपातर्फे प्रदीप कर्पे महापौर पदाचे उमेदवार

धुळे Dhule । प्रतिनिधी

भाजपातर्फे प्रभाग क्र. 11 ड चे नगरसेवक प्रदीप बाळासाहेब कर्पे (Pradip Balasaheb Karpe)यांचे महापौर पदासाठी ( Election of the post of Mayor) नाव निश्चित झाले असून त्यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला. नामांकन अर्ज (Nomination form) दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. दि. 17 सप्टेंबर रोजी होणार्‍या विशेष महासभेत महापौर पदाची निवड होणार आहे. भाजपातर्फे केवळ एकच नामांकन अर्ज दाखल झाल्याने कर्पे यांची महापौरपदी निवड निश्चितच झाली आहे. सभेत केवळ औपचारीक घोषणा केली जाणार आहे.

महापालिकेवर भाजपाचे वर्चस्व असून अडीच वर्ष चंद्रकांत सोनार हे महापौर होते. तर त्यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपल्याने महापौर पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महापौर प्रक्रियेला 11 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे.

आज सकाळी 11 वाजता प्रदीप कर्पे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून चंद्रकांत सोनार, वैशाली भिकन वराडे तर अनुमोदक म्हणून किरण कुलेवार व योगीता प्रशांत बागुल यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. अर्ज दाखल करतांना मावळते महापौर चंद्रकांत सोनार, गजेंद्र अंपळकर, नगरसेविका वैशाली वराडे, किरण कुलेवार, योगीता बागुल, राकेश कुलेवार, भिकन वराडे, प्रशांत बागुल आदी उपस्थित होते.

प्रभाग क्र. 19 अ मधील नगरसेवक आसिफ इस्माईल मोमीन यांनी, शिवसेनेतर्फे नगरसेविका ज्योत्स्ना प्र्रफुल्ल पाटील यांनी, एमआयएम पक्षातर्फे नगरसेविका सहिदा म. इकबाल अन्सारी यांनी अर्ज दाखल केला. एमआयएमतर्फे अर्ज दाखल करतांना शहराचे आ. फारुख शाह हे उपस्थित होते. काँग्रेसतर्फे मदिना समशेर पिंजारी, अपक्ष म्हणून मोमीन आसिफ इस्माईल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com