बर्ड फ्लू : 31 रॅपीड रिस्पॉन्स टिम तयार

तालुका निहाय उपाययोजना
बर्ड फ्लू : 31 रॅपीड रिस्पॉन्स टिम तयार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

राज्यातही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याने प्रशासनाने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ऍक्शन प्लॅनप्रमाणे कार्यवाही सुरू केली आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय 31 रॅपीड रिस्पॉन्स टिम तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 292 फार्ममधून माहिती संकलीत केली जात असून गेल्या तीन दिवसात एकही पक्षांमध्ये अनैसर्गिक मरतून आढळून आलेला नाही.

राज्यातही बर्ड फ्लूची एंट्री झाली आहे. लातूर व अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे अचानक कोबड्या दगावल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

त्यानुसार खबरदारी म्हणून जिल्ह्यात बर्ड प्लू प्रतिबंधक उपाययोजना व सतर्कता करीता नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकुण 292 पोल्ट्री फार्म आहेत. त्यात एकुण 43 लाख 88 हजार हजार 300 पक्षी आहेत. जिल्ह्यात 31 रॅपीड रिस्पॉन्स टिम तालुका निहाय तयार करण्यात आल्या आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

याबरोबरच पक्षांमध्ये मरतूक होत असल्यास त्यांची माहिती संकलीत करून प्रयोगशाळा निदान करण्याचे सुचीत करण्यात आले आहे.

पक्षांमध्ये अनैसर्गिक मृत्यू आढळल्यास त्वरीत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व जिलहा पशुसंवर्धन उपायुकत कार्यालयास कळवावे, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com