शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

माझी वसुंधरा अभियानातंर्गत प्रदूषणमुक्त शहर आणि मास्क लावण्याबाबत जनजागृतीसाठी शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.

या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांचा वापर करु नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.

येथील तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, तहसीलदार आबा महाजन, डीवायएसपी अनिल माने, शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागूल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ केली.

रॅली उपजिल्हा रुग्णालय, खालचे गाव, मांडळ रस्ता, गुजराथी कॉम्प्लेक्स, मेन रोड, पाच कंदील, मारवाडी गल्लीमार्गे पालिकेत पोहचल्यावर रॅलीचा समारोप झाला.

शिरपूर सायकलिस्ट ग्रुप, हनुमान व्यायाम मंदीर ट्रस्ट, खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळ, सोनवणे जिम, डॉ. पां. रा. घोगरे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आदी रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीत जनजागृती करण्यात आली. या रॅलीत अधिकार्यांसह नागरीक सहभागी झाले होते.