धुळ्यातील भुषण पाटील यांची कामगिरी

दादासाहेब फाळके जज्जेस पुरस्कार, रविवारी गुणगौरव
धुळ्यातील भुषण पाटील यांची कामगिरी

धुळे । Dhule। प्रतिनिधी

धुळ्यातील सुपूत्र भुषण संजय पाटील यांच्या लेखन, दिग्दर्शन, निर्मिती असलेल्या ‘मेल फिमेल’ या चित्रपटाला हॉलीहूड लॉसऐजिंलस येथे नामांकन मिळाले आहे. तसेच त्यांना 11 वा दादासाहेब फाळके जज्जेस पुरस्कारही जाहीर झाला आहे.

या निमित्ताने त्यांचा परिचय, संवाद आणि गुणगौरव दि. 1 आगष्ट,2021 रोजी सकाळी 10:30 वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राज्य सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पध्दतीने फेसबुक लाईव्ह होणार आहे.

या कार्यक्रमाला दिग्दर्शक सचिन गोस्वामी, कलावंत शंभु पाटील, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्वागत परिचय प्रा.योगेंद्र कुदळे, राज्य कार्यवाह सांस्कृतिक व अभिव्यक्ती विभाग, महाराष्ट्र अंनिस हे करणार आहेत.

सुत्रसंचलन प्रा. डॉ. दिपक बाविस्कर व रणजित शिंदे हे करतील. भूषण पाटील हे राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे नेते डॉ. संजय पाटील यांचे पुत्र आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. सुरेश बिर्‍हाडे, दिनेश मोरे, अ‍ॅड. विनोद बोरसे, नवल ठाकरे आदींनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com