भरधाव वाहन पुलावरून पांझरेत कोसळले

चार मजुर महिलांसह पाच जण गंभीर, एक जण बेपत्ता
भरधाव वाहन पुलावरून पांझरेत कोसळले

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

मजुरांना (laborers) घेऊन जाणारे भरधाव पिकअप वाहन(pickup vehicle) साक्री तालुक्यातील वार्सा गावाजवळील पांझरा नदीवरील (Panjra river) कांझी फाटा पुलावरून थेट नदी पात्रात कोसळले. (collapsed) त्यात चार महिलांसह पाच जण गंभीर जखमी झाले असून एक जण पाण्यात बेपत्ता झाल्याची चर्चा आहे. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

दरम्यान, वाहनात नेमके किती मजुर होते हे कोणीही सांगितले नाही. तर वाहन चालक फरार झाल्याचे कळते.

मांजरी (ता. साक्री) येथून पांढर्‍या रंगाचे छोटा हत्ती वाहन मजूर घेवून पिंपळनेरकडे येत होते. त्यादरम्यान वार्सा ते मांजरी रस्त्यावरील पांझरा नदीवरील कांझी फाट्याजवळील पुलावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट पुलावरून नदी पात्रात कोसळले. ही घटना रस्त्यावरून जाणार्‍यांच्या लक्षात आली. त्यांनी नागरिकांना बोलावून मजुरांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातील पाच मजुरांना बाहेर काढून खाजगी वाहनाने पिंपळनेर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यात चार महिलांचा समावेश आहे. त्यातील एकाला धुळे येथे उपचारासाठी हलविल्याचे समजते. नागरिकांनी मजुरांना वाचविले असले तरी एक मजूर बेपत्ता झाल्याचे चर्चा सुरू होती. याबाबत पिंपळनेर पोलिसात उशिरापर्यंत कुठलीही नोंद झालेली नव्हती.

अपघातातील जखमी बिजनाबाई सुक्राम बारिस (35 रा. मांजरी), यशवंती बिट्या कुवर (15 रा. मळगाव), आमशाबाई अंतरंग राऊत (35 रा. मांजरी), अंतीबाई पुनाजी बहिरम (36 रा.मांजरी) यांच्यावर पिंपळनेर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.